सोशल मीडियानं अधिकाधिक निष्पक्ष, पारदर्शी आणि जबाबदार होणं, ही काळाची गरज आहे!
सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातींवर पूर्णपणे प्रतिबंध लादणं, हा यावरचा उपाय होऊ शकतो अथवा नाही, हा चर्चेचा विषय होऊ शकतो, कारण आजच्या सोशल मीडियाच्या जगात एखादी गोष्ट जाहिरात असणं किंवा नसणं यातली रेषा धूसर होत चालली आहे, पण त्याविषयी समाज माध्यमांच्या व्यासपीठांनी अधिकाधिक निष्पक्ष, पारदर्शी आणि जबाबदार होणं ही काळाची गरज आहे, हे मात्र नक्की.......